जळगाव - डिझाइन क्षेत्रातील नामांकित अशा राष्ट्रीय स्तरावरील एनआयडीच्या (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन) या प्रवेश परीक्षेत ऋषिकेश प्रमोद पिंगळे याने यश मिळवले आहे.
सचिन मुसळे यांच्या श्री ड्रॉईंग आणि पेंटिंग क्लासेसचा ऋषिकेश विद्यार्थी आहे. तीन स्तरावर होणाऱ्या या परीक्षेत दर वर्षी तीस ते चाळीस हजार विद्यार्थी सहभाग नोंदवतात. व त्यातून मोजक्याच विद्यार्थ्यांची यात निवड होत असते. तीनही टप्प्यात ऋषिकेशने आपल्या कौशल्याच्या बळावर यशस्वीपणे मिरीट मध्ये स्थान मिळवले आहे. ऋषिकेश सचिन मुसळे यांचा विद्यार्थी असून जळगावातील नामवंत महावीर क्लासमधील शिक्षक श्री प्रमोद पिंगळे सर यांचा मुलगा आहे. त्याने आपल्या या यशाचे श्रेय आपले आई,वडील श्री नंदलाल गादीया सर आणि गुरू श्री सचिन मुसळे यांना दिले आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र त्याचे कौतुक केले जात आहे....