अयोध्या (वृत्तसंस्था)- अयोध्येतील राम मंदिराचा भुमीपुजन सोहळा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाला. या सोहळ्याच्या निमित्ताने अयोध्या असल्याचा भास झाला होता. जय श्रीराम या घोषणेने स्वागत केले जात होते.
सन 1991 मधे 29 वर्षापुर्वी कन्याकुमारीपासून तिरंगा यात्रा सुरु झाली होती. या तिरंगा यात्रेच्या निमीत्ताने पंतप्रधान नंरेंद्र मोदी त्यावेळी मुरली मनोहर जोशी यांच्यासमवेत अयोध्येत आले होते. महेंद्र त्रिपाठी यांनी त्यावेळी मोदी यांना विचारले होते की आता तुम्ही अयोध्येत केव्हा येणार आहात? श्रीराम मंदीर उभे राहील तेव्हाच आपण अयोध्येत येवू असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावेळी जाहिर केले होते. 29 वर्षापुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले आश्वासन या निमित्ताने पुर्ण केले आहे. आता नरेंद्र मोदी पंतप्रधान असल्यामुळे या भुमीपुजनाचा मान देखील त्यांना मिळाला.