जळगाव - दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आशा फौंडेशनने आपल्या वर्धापनदिनानिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे. "रुप पालटू वसुंधरेचे...नैसर्गिक जीवनशैलीने" या संस्थेच्या यावर्षीच्या मध्यवर्ती संकल्पनेवर हि स्पर्धा आधारित आहे. शालेय, महाविद्यालयीन व खुल्या गटात होणाऱ्या या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी निगेटिव्ह टू पॉझिटीव्ह फौंडेशन या फेसबुक पेजचे सहकार्य लाभले आहे.
शालेय गट
विषय : निसर्ग चक्रातील घटकांची परस्परपूरकता
शब्द मर्यादा : ३०० शब्द प्रवेश फी रु. १०/-
महाविद्यालयीन गट
विषय : निरोगी व आनंदी जीवनासाठी नैसर्गिक जीवनशैली
शब्द मर्यादा : ५०० शब्द प्रवेश फी रु. २०/-
खुला गट
विषय : रुप पालटू वसुंधरेचे... नैसर्गिक जीवनशैलीने
शब्द मर्यादा : ७०० शब्द प्रवेश फी रु. ३०/-
स्पर्धेचे नियम-
१. निबंध मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतून स्वीकारले जातील.
२. निबंध ९८२३६५४८११ किंवा ९४२३९३९६९५ या व्हाट्सअँप क्रमांकावर किंवा girish.kulkarni@indeea.co.in किंवा sujata.borkar@indeea.co.in या ईमेलवर पाठविता येतील.
३. स्पर्धेचे शुल्क गुगल पे वा फोन पे द्वारे ९८२३३३४०८४ स्वीकारले जाईल.
४. प्रत्येक गटातील प्रथम तीन स्पर्धकांना पुस्तक स्वरुपात पारितोषिके देण्यात येतील.
५. प्रथम क्रमांक विजेत्या निबंधांना संस्थेच्या "अभिनीत" मासिकात प्रकाशित करण्यात येईल.
६. निबंध पाठविण्याची अंतिम दि. २९ ऑगस्ट २०२० आहे.
सर्वांना विनंती आहे जास्तीत जास्त शाळा, महाविद्यालये, विद्यार्थी / शिक्षक यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी सहकार्य करा.
अधिक माहितीसाठी
गिरीश - ९८२३३३४०८४
सुजाता - ९८२३६५४८११
मधुकर - ९४२३९३९६९५