नगरसेवक सुरेश पाटील व प्रताप शिंपी यांनी दिले नगराध्यक्ष यांना निवेदन
अमळनेर (प्रतिनिधी):- प्रभाग क्रमांक 3 शनिपेठ भागात अमळनेर नगरपरिषदेचे अमरधाम असून याठिकाणी शहरातील बहुतांश मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात असतात. याठिकाणी पारंपारिक पद्धतीने अंत्यसंस्कार केले जातात.
कोरोना महारोगाच्या काळात याठिकाणी बाधित मृत व्यक्तींवर शासकीय यंत्रणेने मार्फत अंत्यसंस्कार केले जातात, परंतु चुकीच्या पद्धतीने मृतदेह हाताळले जात आहेत. काही वेळा मृतदेह अपूर्ण जळालेल्या अवस्थेत असतात यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे,
तरी नगरपालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष देणे अपेक्षित आहे. यासाठी शहरातील शनीपेठ अमरधाम येथे विद्युत शवदाहिनी बसवण्यात यावी. यामुळे मृतदेहांची अवहेलना होणार नाही तसेच पर्यावरणाची हानी सुद्धा होणार नाही तरी त्वरित याबाबत नगर पालिके मार्फत कार्यवाही व्हावी अशी मागणी नगरसेवक सुरेश पाटील,प्रताप शिंपी यांनी केली आहे.