जळगाव - कोरोनाच्या या महामारीच्या संकटात जिवाची पर्वा न करता नागरिकांच्या सुरक्षे साठी अहोरात्र केलेल्या कार्याबद्दल ईकरा फाउंडेशन चे अध्यक्ष अलहाज डॉ अब्दुल करीम सालार यांचा त्यांच्या राहत्या घरी , ऑल इंडिया पोलिस सेवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष्य श्री प्रकाश डोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ऑल इंडिया पोलीस सेवा संघटना भारत जळगांव जिल्हा अध्यक्ष भावेश ठाकूर, जळगांव जिल्हा महिला अध्यक्षा श्रीमती शितल जडे, शहरअध्यक्ष श्री तिलोत्तमदास (अतुल) बोंडे व रायसोनी इन्स्टिट्यूट चे विभाग प्रमुख प्रा रफिक शेख , * ऑल इंडिया पोलीस सेवा संघटना भारतचे सदस्य चि. कुणाल संजय जडे, ओमप्रकाश राठोड यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
करीम सरांनी मालेगाँव व जळगाव डॉक्टर्सच्या टीम सोबत जळगाव शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी मेडिकल चेकअप कॅम्प लावले आणि शरीरातील प्रतिकारशक्ती वाढविण्याकरीता युनानी काढा व होमिओपॅथीच्या गोळयांचे वितरण केले ,कोविड सेंटर मध्ये पॉझिटीव्ह रुग्णांची आपुलकीने विचारपूस करुन क्वारंटाईन सेंटर मध्ये जिल्ह्यातील रुग्णांची देखरेख, हे सगळे कार्य डॉ अब्दुल करीम सालार साहेब आपल्या वयाच्या साठीत एका तरुणा सारखे करीत आहे ही कौतुकास्पद बाब आहे.