शानभाग विद्यालयात गणेशोत्सव निमित्त विविध स्पर्धा संपन्न

जळगाव :- सोमवार, २४ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२० दरम्यान विवेकानंद प्रतिष्ठान संचालित कै.ब.गो.शानभाग, सावखेडा येथे गणेशोत्सव हा विद्यार्थ्यांच्या विविध ऑनलाईन स्पर्धा घेवून साजरा करण्यात आला. सोमवार, २४ ऑगस्ट २०२० रोजी विद्यालयाच्या आवारात श्री. गणेशाची स्थापना मुख्याध्यापिका मा. श्रीमती अंजली महाजन दीदी, उपमुख्याध्यापक मा. श्री. जयंतराव टेंभरे सर, निवासी विभाग प्रमुख श्री. शशिकांत पाटील, विभाग प्रमुख श्री. जगदीश चौधरी, श्री.राजेंद्र पाटील यांची उपस्थितीत करण्यात आली.


या प्रसंगी सोशियल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करून आणि मास्क लाऊन इतर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सुद्धा उपस्थित होते. याप्रसंगी सोमवार, २४ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२० दरम्यान विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी पुढील प्रमाणे स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यात दि. २४ ऑगस्ट रोजी ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धा, दि. २५ ऑगस्ट रोजी ऑनलाईन गणपती वरील गीत गायन स्पर्धा, दि. २७ ऑगस्ट रोजी ऑनलाईन श्री गणेशाच्या जीवनावरील कथाकथन स्पर्धा, दि. २८ ऑगस्ट रोजी इकोफ्रेंडली गणपती सजावट व आरास स्पर्धा या स्पर्धेचे स्वरूप पुढीलप्रमाणे होते विद्यार्थ्यांनी नैसर्गिक साधनांचा वापर करून गणपतीची सजावट करावी आणि त्याचे फोटो ऑनलाईन शाळेच्या व्हाटस्अॅप ग्रुपवर पाठवायचे यातून उत्कृष्ट सजावटीला परीक्षक निवडतील, दि. २९ ऑगस्ट रोजी गणपतीची विविध रूपे असलेली चित्रकला स्पर्धा आणि दि. ३१ ऑगस्ट रोजी सेल्फी विथ बाप्पा या स्पर्धेचे स्वरूप म्हणजे विद्यार्थ्यांनी आपल्या घरातील सजावट केलेल्या बाप्पाच्या मूर्तीसोबत आपला एक सेल्फी फोटो काढून शाळेच्या व्हाटस्अॅप ग्रुपवर टाकायचा अशा प्रकारच्या स्पर्धांचा समावेश होता.


या सर्व स्पर्धांमध्ये विद्यालयातील सकाळ आणि दुपार विभाग मिळून एकूण ३७३ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. सर्व स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना ऑनलाईन प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. या कार्यक्रम यशस्वितेसाठी सर्व वर्गातील वर्गशिक्षकांसोबत श्री. ललित वाघ, श्री. जयंत भोगे, मनीषा भालेराव, प्रतिभा जाधव, जागृती भामरे, गायत्री सोनवणे कार्यक्रम प्रमुख यांच्या सोबत सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.