जळगाव - आपला भारत देश असा आहे की इथे सामन्य नागरिक ही देशासाठी त्याग व बलिदान देण्यासाठी देशसेवेसाठी तत्पर आहे.समाजाचे व देशाचे आपण काहितरी देणे लागतो ही जाणिव प्रत्येक भारतीयांच्या मनात रुजलेली आहे.अशाच एका राष्ट्रसेवक श्री रफिक हबिबोद्दिन शेख यांचा ऑल इंडिया पोलीस सेवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री प्रकाश डोंगळे यांच्या मार्गदर्शनाने सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी जळ्गाव जिल्हाअध्यक्ष भावेश ठाकुर, जिल्हाध्यक्ष्या श्रीमती शितल जडे, शहर अध्यक्ष अतुल बोंडे व प्रोफेसर रफिक शेख़ सर हे उपस्थित होते. देशप्रेम असलेल्या सेवा भावामुळे वयाच्या अवघ्या अठराव्या पॅरामिलट्री फौज सी.आर.पी.एफ मध्ये भरती झाले. अगदी लहानपणापासून फौज मध्ये भरती होऊन त्यांनी जम्मू , काश्मीर , मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, मणीपूर, दिल्ली आणि गडचिरोली, नारायणपुर सारख्या नक्षलग्रस्त भागातही आपले कर्तव्य बजावले. परंतु पुढे न मानवणार्या पाठ दुःखी मुळे त्यांना मनात नसताना सेवानिवृत्ती घ्यावी लागली.
पण देशसेवाचा प्रण घेतला असताना त्यांना घरी राहणे मान्य नव्हते व रुग्णसेवा म्हणजे देशसेवा या विचाराने त्यांनी सेवानिवृत्तीनंतरही आपली देशसेवा कायम ठेवली.काही काळानंतर अचानक कोरोना विषाणूचे संकट देशावर आले, या काळात गोरगरीब व अत्यंत गरजू माणसांना आपल्या परीने त्यांनी योग्य ती मदत केली. व जेव्हा इतर दवाखाने बंद असताना, ते कार्यरत असलेल्या खाजगी दवाखान्यात त्यांनी कोरोना युद्धाव राष्ट्र रक्षकाला आपले कार्य आजही अविरत ठेवून जीवन देश सेवेसाठी अर्पण केलेल्या जवानाला मानाचा सलाम