स्वच्छ सर्वेक्षण अभियान; साडेसात कोटी रुपयांचा निधी मिळणार : यशाचे श्रेय तमाम 50 हजार जनतेचे : माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांची माहिती
वरणगाव : राष्ट्रीय स्तरावरील स्वच्छ भारत अभियान अंतर्गत 2020 चा निकाल गुरुवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत घोषित करण्यात आला.
स्वच्छ सर्वेक्षणात 50 हजार लोकसंख्येच्या आतील शहरात वरणगाव शहराचा भारताच्या पश्चिम विभागात 23 वा क्रमांक व नाशिक विभागात पाचवा क्रमांक मिळाला असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी दिली. नवनिर्मित पालिका असतानादेखील स्वच्छ सर्वेक्षणात सहभाग घेतला होता.
28 नोव्हेंबर 2017 रोजी माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारून 2018 मध्ये 48 वा क्रमांक, 2019 मध्ये 79 वा क्रमांक तर 2020 मध्ये आलेख उंचावत वरणगाव नगरपरीरषदेस स्वच्छ सर्वेक्षण यात 4198.57 हे गुण मिळवल्याने देशात 23 वा तर नाशिक विभागात पाचवा क्रमांक मिळवला आहे. वरणगाव शहरास ओडीएफ प्लस प्लसचा दर्जा, जीएफसी एक स्टार रेटिंग प्राप्त झाले आहे.