वृत्तपत्र वितरण करणा-यांना बांधवांना मानधन मिळावे:-संघाची मागणी.

वृत्तपत्र वितरण करणा-यांना बांधवांना मानधन मिळावे:-संघाची मागणी.


कोरोनोच्या पार्श्वभूमीवर लाॅकङाऊन आहे,पेपर ङोअर टू ङोअर वाटपासाठी सरकारने बंदी घातली असल्याने पेपर टाकणा-यांवर उपासमारीची वेळ आली आहे, या उद्योगात लाखो जणांना रोजगार आहे,पर्यायाने त्याच्या कुटुंबावर मोठे संकट येणार असल्याने,सरकारने त्यांना तातडीची मदत द्यावी,अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने मा.मुख्यमंत्री यांना मागणी करण्यात येणार आहे. 
   वृत्तपत्र आणि वाचक यांच्यातील महत्वाचा दुवा म्हणजे पेपर टाकणारी मुले/माणसे होय.वृत्तपत्र सकाळी सकाळी वेळेत व कधीच सुट्टी न घेता पोहचवण्यासं काम करित असतात.या व्यवसायात अनेकांना रोजगार मिळाला असला तरि यांच्या पदरी कायम घोर निराशा आहे.मात्र यांच्या आयुष्यात जगतात कसे,दिवसभर काय करतात,झोपतात कधी याची काळजी कधीच कोणी घेतल्याचे दिसत नाही.करण्याची गरज ना वाचकांना कधी भासली,ना सरकारला ना वृत्तपत्रांच्या मालकांना.त्यांचे पश्न,त्यांची दुःख त्यांच्या वेदना समजावून घेण्याची गरज वाटली नाही,प्रसिद्धी माध्यमांशी निगङित असलेला घटकच उपेक्षित व वंचित राहिला.त्यांचा आवाज मुक-बधिर सरकारच्या कानांपर्यंत कधी गेलाच नाही.
या पेपर टाकणा-यांना यातून मोठा रोजगार उपलब्ध झाला असला तरि तुटपुंजा कमिशन अत्यंत प्रामाणिक सेवा बजावत आहेत.यांच्यावर संपूर्ण कुटुंबांचा उदार्हनिर्वाह आहे,कोणत्याही सवलती नाही, सुट्टी नाही, मानधन नाही, अंक वितरित करण्यासाठी रोखीने घ्यावे लागतात.अशातच वृत्तपत्र घरोघरी वितरण करण्यास मनाई केल्याने यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे, अशातच लाॅकङाऊन सुरू आहे, यांचे जीवनमान वृत्तपत्र विक्रीकर अवलंबून असल्यामुळे सरकारने एक तर निर्णय मागे घ्यावा,अन्यथा या पेपर टाकणा-यांना आर्थिक मदत तातडीने जाहीर करावी,अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने मा.मुख्यमंत्री यांना करण्यात येणार आहे,या निवेदनावर संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सुर्यवंशी, कार्याध्यक्ष डॉन के.के.,उपाध्यक्ष प्रवीण परमार,कोषाध्यक्ष राजाराम माने, सचिव डॉ. सुरेंद्र शिंदे, सल्लागार बाळासाहेब अडांगळे, विनोद पवार ,विकास पाटील, दशरथ रोडे,प्रतिमा चौहान,कैलास गडदे, संतोष परदेशी, प्रकाश चीतळकर, सुभाष परदेशी, सुनील चौधरी, छोटुलाल मोरे, कृष्णा पेंडसे, . संजय रुपनर,सचिन जाधव,
सतीश परदेशी, हेमलता महाले,साबीर बागवान, प्रल्हाद पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.