🙏 महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने पोलिसांना सैनीटायझर मास्क व फळवाटप🙏
करोनाच्या पार्श्वभूमीवर चोवीस तास कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने मास्क व सॅनीटायजर वाटप करण्यात आले. करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. सर्वत्र संचारबंदी आहे, मात्र पोलिस दिवस-रात्र आपले कर्तव्य चोखपणे बजावत आहेत. हद्दीतही ठिकठिकाणी पोलिस तैनात केले आहेत. गर्दी होणार नाही, यासाठी पोलिस विशेष खबरदारी घेत आहेत. त्यामुळे संघांच्या वतीने पोलिसांना वाटप करण्यात आले.यावेळी संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सुर्यवंशी, रायगड जिल्हा अध्यक्ष नंदकिशोर भोईर प्रदेश कोअर कमिटी संघटक प्रल्हाद पाटील, तसेच सामाजिक कार्यकर्ते हरिष पाटील उपस्थित होते.