पत्रकारांना मास्क वाटप,ग्रुप ग्रामपंचायत कोळखे पेठ चा कौतुकास्पद उपक्रम
🙏
संपूर्ण जगात आलेल्या संकटाला सामोरे काही प्रतिबंधात्मक उपाययोजना करू यात.या अनुषंगाने ग्रुप ग्रामपंचायत कोळखे पेठ पारपूङ च्या
वतीने महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघाच्या पत्रकारांना मास्क वाटप करण्यात आले. पत्रकार समाजासाठी महत्वपूर्ण आणि अत्यावश्यक सेवा देत आहे.
कोरोना साथीमुळे होणार्या संभाव्य धोक्यापासुन पत्रकारांचा बचाव होण्याकरिता उपाययोजना म्हणून
कोळखे पेठ ग्रामपंचायत च्या वतीने
पत्रकारांना संरपच सौ.विजया पुरते व गणेश सुरते ग्रुप च्या स्वखर्चाने मास्क वाटप केले आहे.
कार्यक्रमाचा उद्देश चांगला असल्याने महिला सरपंच सौ.विजया सुरते यांचे नागरिकांनी कौतुक केले.वास्तविक पाहता आरोग्याची काळजी एक महिलाच कसे घेऊ शकते याचे उत्तर उदाहरण आहे, याच बरोबर संकटकाळी पत्रकार हा घटक किती महत्वाचा असतो,याची जाणीव सौ.विजया सुरते करून देवून अनेकांच्या ङोळ्यात या उपक्रमातून अंजन घालण्याचे काम करित आहेत.
या उपक्रमाला पुरोगामी पञकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सुर्यवंशी महाराष्ट्र कोअर कमिटी सदस्य प्रल्हाद पाटिल रायगड जिल्हा अध्यक्ष नंदकिशोर भोईर जिल्हा उपध्यक्ष प्रशांत भोईर
सह अनेकांनी उत्फूर्तपणे सहभाग नोंदविला होता.
पत्रकारांना मास्क वाटप,ग्रुप ग्रामपंचायत कोळखे पेठ चा कौतुकास्पद उपक्रम