प्रती,
मा.मुख्यमंत्री ,ना.उध्दवजी ठाकरे साहेब,
महाराष्ट्र राज्य,
मंत्रालय , मुंबई
विषय : पत्रकार व कुटुंबासाठी मदतीचे विशेष पॅकेज मिळणेबाबत.
महोदय ,
राज्यात कोरोना सारख्या महाविषाणुचा फैलाव जोरात सुरु होताच आपण घेतलेल्या लॉकडाऊनचा स्तुत्य निर्णय घेतलात.,त्याबद्दल आपले सर्वप्रथम पत्रकार बांधवांच्यावतीने मनःपूर्वक अभिनंदन.कोरोनाच्या संकटाचा सामना महाराष्ट्रातील नागरिक करत आहेत, त्यामुळे महाराष्ट्र सरकारने जनता कर्फ्यू व लॉक डाऊन सारखे अनेक चांगले मोठे निर्णय घेतले असून अाम्ही आपल्या निर्णयाचे स्वागत करीत आहोत.पोलीस, डॉक्टर, व प्रशासकीय यंत्रणेबरोबर पत्रकार ,प्रेस फोटोग्राफर बांधवही आपल्या जिवाची पर्वा न करता जनजागृती करीत आहेत.
किमान सध्या देशात कोरोनोच्या पार्श्वभूमीवर जनता कर्फ्यू (संचार बंदि)असताना,जर एखाद्या कोरोनो बाधित रूग्णांच्या संपर्कात पत्रकार आला तर संपूर्ण यंत्रणा बाधित होईल.त्यामुळे पत्रकारांना मास्क,सॅनिटायझर, सुरक्षा किट सोबतच विमाकवच मिळावे.
कोरोनोच्या कठीण काळात राष्ट्रीय कर्तव्य बजावणा-या माध्यमांनीही (कोणतेही असो)आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने विशेष मदत करावी अशी मागणी राज्यभरातून होत आहे. त्यामुळे महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने आम्ही मागणी करत असून सहानभुती पूर्वक विचार करावा.सदरच्या निवेदनावर संघाचे विजय सुर्यवंशी, प्रवीण परमार,संजय रूपनर,ङाॅन एन.के.के.,राजाराम माने डाँ सुरेन्द्र शिदे पवार,सचिन जाधव यांच्या स्वाक्षरी असलेले निवेदन मुख्यमंत्री मा.उध्दव ठाकरे यांना ईमेल केले आहे.