जगभर थैमान घातलेल्या कोरोनो या आजाराचे रूग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. भारतामध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसतोय.देशात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 242 वर पोहोचला असून आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झालेला आहे. देशातील सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात 63 रुग्ण कोरोनो पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यातच आता जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात मुंबईहून यावल येथे आलेला एक कोरोंना संशयित आढळून आला आहे.
28 वर्षीय संशयित युवक हा मुंबई येथून नुकताच परतला आहे. या युवकाची ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक तपासणी करू पुढील तपासणीसाठी जळगाव ला पाठवण्यात आले आहे. हा युवक ज्या मित्रांच्या सहवासात होता त्यातील एक युवक हा संशयित रुग्ण होता. त्यांचा साथीदार म्हणून येथील युवकाचे नाव समोर येताच मुख्याधिकारी बबन तडवी व आरोग्य निरीक्षक शिवानंद कानडे यांना मुंबईवरून माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अरुण धनवडे व यांना सूचना देत त्या तरुणाचा शोध घेऊन येथील ग्रामीण रुग्णालयात तपासणी करून त्याच्या पुढील चाचणीसाठी जळगाव ला पाठवण्यात आले आहे.
महाराष्ट्रामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. बाधित रूग्णांची संख्या आता 63 वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात आज 21 मार्च रोजी एकूण रुग्णांची संख्या ही 63 वर पोहोचली आहे. गुरुवारी ही संख्या 52 वर होती. त्यामुळे गेल्या 24 तासांत 11 नवीन रुग्ण आढळून आल्याचे समोर आले आहे.