बेटावद बु येथील मोठा दवाखाना बंद ; ग्रामपंचायत उदासीन


बेटावद (प्रतिंनिधी )-  जगभरात कोरोणोची साथ सुरू असून केंद्र व राज्य शासन प्रभावी उपाययोजना राबवित आहेत. आता  पर्यंत देशभरात 300 रुग्ण व महाराष्ट्रात 64 रुग्ण आढळूण आले आहेत. पंतप्रधान नरेंद मोदी यांनी आज देशभरात जनता कर्फ्यू चे आवाहन  केले होते. त्यात जनतेने प्रचंड प्रतिसाद दिला. व तो यशस्वीही झाला आहे. परंतु बेटावद बु  येथील दवाखाना मात्र बंद अवस्थेत आढळून आला. 


बेटावद बु  दवाखाना हा पंचक्रोशीतील मोठा दवाखाना असून बंद अवस्थेत असणे  हे दुर्भाग्य च आहे.यावेळी दवाखान्यात कोणत्याही उपाय योजना करण्यात आल्या नाही याची खंत वाटते, कोणतेही जबाबदार अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, ग्रामसेवक, कोणतीही खबरदारी घेतांना दिसले नाहीत