बोदवड तालूक्यात कोरोनाचा संशयित ; गावात घबराहटीचे वातावरण

बोदवड ( प्रतिंनिधी ) - जगभरात थैमान घालनार्‍या कोरोनो व्हायरसचा संशयित आज जिल्हयातील  बोडवड तालुक्यात  आढळून आला आहे.  या सं​शयित तरूणात सर्दी खोकला, ताप, अंगदूखी अस कोरोनो व्हायरस च्या  रूग्णाशी मिळते जुळते लक्षणे आढळून आल्याने जिल्हा रूग्णालयात पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.  



           बोडवड तालुक्यात हा रूग्ण आढळून आला असून त्याचे वय 21 वर्ष आहे.  संशयित तरूण हा पुणे येथील एका खाजगी कंपनीत नोकरी आहे. कोरोनो विषाणूचा संसर्ग होवू नये म्हणून प्रशासनातर्फे खबरदारी म्हणून गर्दी होईल असे सर्व ठिकाणे बंद  करण्याचे आदेश देण्यात आले आहे.  यात प्रशासनाने कंपन्या, खानावळी, महाविदयालये तसेच होणार्या परिक्षा पुढे ढकलल्या आहेत. कंपनी व सर्व खानावळी बंद असल्याने संशयित तरूण हा गावात परतला. या तरूणात सर्दी खोकला, ताप, अंगदूखी अस कोरोनो व्हायरसची लक्षणे आढळून आल्याने गावातील पोलीस पाटील यांना माहिती देण्यात आली. प्रशासनाने बाहेर गावाहून येणार्या लोकांवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले होते त्यामुळे पोलीस पाटील यांनी खबरदारीचा उपाय म्हणून तहसिलदार रविंद्र जोगी यांना या संशयित तरूणाची माहिती दिली. तहसिलदार रविंद्र जोगी यांनी तात्काळ तालुका आरोग्य अधिकार्यांना याबाबत माहिती दिली. यानंतर त्यानंतर जिल्हा रुग्णालयाच्या टिमने सदरील स्थळी जात संबंधित रुग्णास पुढील योग्य त्या तपासणीसाठी जिल्हा रूग्णालयात रवाना केले  आहे. या घटनेन तालुक्यात विविध चर्चांना उधाण आल्याने एकच खळबळ उडाली आहे. उद्या दि.20 दुपारपर्यंत संशयित तरूणाचा अहवाल आल्यानंतर या संशयित तरूणास कोरोनो विषाणूची लागण झाली आहे किंवा नाही हे सिध्द होणार आहे. 


       जगभरात कोरोना विषाणूची दहशत असून आतापर्यंत  हा विषाणू 140 देशात पसरला असून देशभरात  कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. सध्या देशात  कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 166 झाली आहे. देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात असून त्यांची संख्या 42 झाली आहे.


    कोरोनाच्या दहशतीखाली नागरिक आहेत. बाहेरुन येणार्या नागरिकांना साधा सर्दी खोकला जरी आला तरी त्याच्याकडे 'कोरोना व्हायरयच्या' संशयाने बघितले जाते.  पूर्ण गावात त्याचीच चर्चा असते. विविध अफवामुळे नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण होते. त्याकरिता मुंबई , पुणे , औरंगाबाद, मुंबई अहमदनगर  अशा विविध शहरातून  येणार्या नागरिकांनी जिल्हा रुग्णालयात तपासणी करुनच गावात परतणे आवश्यक आहे. जेणेकरुन संशयिताच्या नावाखाली  नागरिक दहशतीखाली राहणार नाहीत.