सामाजिक कार्यकर्ते विनोद पवार यांची क्राईम अँड करप्शन कंट्रोल असोसिएशन दिल्ली,च्या जळगांव जिल्हा डिटेक्टिव्ह ऑफिसर पदी निवड

जळगांव (प्रतिंनिधी) - येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पुरोगामी पत्रकार संघाचे कोअर कमिटीचे अध्यक्ष श्री.विनोद पवार यांची क्राईम अँड करप्शन कंट्रोल असोसिएशन दिल्ली, नीती आयोग यांच्या अंतर्गत नुकतीच जळगाव जिल्ह्याच्या  "डिस्ट्रिक्ट डिटेक्टिव्ह ऑफिसर पदी "  नियुक्ती करण्यात आली आहे.



          शहरातील सामाजिक कार्यकर्ते असलेले विनोद पवार यांची चीफ इन्वेस्टिगेशन ऑफिसर महाराष्ट्र श्री.अश्विन खैरनारयांनी राष्ट्रीय अध्यक्ष दिनेश गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्ती केलीे.यामुळे निश्चितच आता जळगांव जिल्ह्यातील गुन्हे व भ्रष्टाचाराला आळा बसेल याची खात्री जनमानसात उमटत आहे. लवकरचजिल्ह्यासाठी एक समिती स्थापन होणार आहे असे जिल्हा अध्यक्ष श्री.शैलेश सोनवणे यांनी सांगितले तसेच त्यांचे जिल्ह्यासाठीचे जनसंपर्क कार्यालयाचे लवकरच उदघाटन होणार आहे.त्यामुळे जे गुन्हे किंवा भ्रष्टाचार करतील त्यांच्यावर त्वरित वरिष्ठ अधिकाऱ्याकडून कारवाई करण्यात येईल असे औरंगाबादचे जिल्हा अध्यक्ष श्री.गणेश चौधरी यांनी सांगितले  यांच्या निवडीमुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. जिल्ह्यातील नागरिकांचे प्रश्न लवकर सुटावेत त्यासाठी कुठलीही आर्थिक झळ बसू नये यासाठी माझा प्रयत्न असेल अशी  माहिती विनोद पवार यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल जिल्ह्यातून सर्व स्तरावर अभिनंदन होत आहे.