जळगाव (प्रतिंनिधी)- शहरातील नेरी नाका व खेडी परिसर येथील पेट्रोल चालक हे मनमानी कारभार करीत असून मर्जीतील मित्र मंडळी किंवा ओळखीच्या लोकांना सर्रास पेट्रोल वितरीत करीत आहे. मात्र जे पत्रकार समाजातील घडणार्या घटनांचे वार्तांकन करून इंत्यभूत माहिती समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम करीत असतात त्या पत्रकारांना मात्र पेट्रोल देण्यास नकार देउन अरेरावीची भाषा केली जात आहे.
जगभर थैमान घालणार्या कोरोना व्हायरस चा प्रार्दुभाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने 14 एप्रिल पर्यंत पूर्ण भारत लॉकडाउन घोषित केला आहे. या काळात खाजगी वाहनांना प्रतिबंध घालण्यासाठी पेट्रोल चालकांना पेट्रोल देण्यास मनाई करण्यात आली आहे. परंतु काही महत्वाच्या सेवा वगळता जसे की डॉक्टर, रूग्णवाहिका, पत्रकार, महत्वाच्या व्यक्ती यांना मात्र यातून वगळण्यात आले आहे. असे असतांना देखील काही पेट्रोल चालक मनमानी कारभार करीत मुजोरपणा दाखवित आहेत.
फिल्डवर काम करतांना पेट्रोल भरण्यास गेलेल्या पत्रकारांना खेडी तसेच नेरी नाका येथील पेट्रोल पंपावरील पेट्रोल चालकाने पेट्रोल भरण्यास नकार दिला. मात्र मर्जीतील लोकांना मात्र सर्रास पेट्रोल दिले जाते. पत्रकारांनी जाब विचारला असता पेट्रोल हवे असेल तर तसे तहसिलदार यांच्याकडून लेखी पत्र आणा तेव्हाच तुम्हाला पेट्रोल दिले जाईल असे पेट्रोल पंप चालक पत्रकारांना सांगत मुजोरपणा दाखवत आहेत.
पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ असतो. रोज घडणार्या घडामोडी व समाजात होणार्या चुकीच्या गोष्टींना वाचा फोडण्याचे काम हे पत्रकार करीत असतात. सध्या कोरोना सारख्या महामारीने जगभर थैमान घातले आहे. या काळात आपला जीव धोक्यात घालून जीवाची पर्वा न करता पत्रकार आणि डॉक्टर हे समाजाची सेवा करीत आहे. देशात काय परिस्थिती आहे हे सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम पत्रकार करतात. अशा परिस्थितीत पेट्रोल पंप चालक पत्रकारांना ऑन फिल्डवर काम करत असतांना जळगाव येथील शिवधर्म साप्ताहिक न्यूज पेपर चे मुख्य संपादक विनोद पवार हे सकाळी पेट्रोल भरण्यात गेले असतांना जळगाव खेडी येथील पेट्रोल पंप आणि नेरी नका पेट्रोल पंप चालकांनी पेट्रोल देण्यास देण्यास नकार देऊन त्यांना माघारी पाठविण्यात आले. कोरोना सारख्या आजाराने जगात आणीबाणीची स्थिती तयार करून अनेकांना जीव गमवावा लागत आहे एका प्रकारे भीतीचे वातावरण तयार झाले आहे या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पत्रकारांना फिल्डवर काम करावे लागते या करीता माननीय जिल्हाधिकारी साहेब तसेच तहसीलदार साहेबांनी पत्रकारांना पेट्रोल देण्यास परवानगी द्यावी जेणेकरून समाजात घडणाऱ्या घटनांचे वृत्तांकन करून ते समाजापर्यंत पोहचण्यास मदत होईल.