रावेर, बोडवड व चाळीसगाव रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्म तिकीट महागणार

जळगाव (प्रतिंनिधी) : भुसावळ विभागातील रावेर, बोडवड व चाळीसगाव रेल्वे स्थानकावरील pletform प्लॅटफार्म तिकीट  महागणार असून ते  10 वरून 30 रुपये करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतलेला आहे. चीन मधून प्रसार झालेल्या आणि संपूर्ण जगाला हादरवून सोडण्यार्‍या कोरोनो व्हायरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि अनावश्यक गर्दीला आळा घालण्यासाठी  दक्षता म्हणून हा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी संगितले. 



 


     या अगोदर भुसावळसह आठ रेल्वे स्थानकांचे तिकीट 10 रुपयांवरून 50 रुपये करण्यात आले होते. रेल्वेच्या या निर्णयामुळे अनावश्यक गर्दीला आळादेखील घातला जाणार आहे.  मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील 14 रेल्वे स्थानकांचे तिकीट दर दहा रुपयांवरून 30 रुपये करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. 


   भुसावळ विभागातील देवळालीसह लासलगाव, निफाड, नांदगाव, चाळीसगाव, पाचोरा, बोदवड, मलकापूर, नांदुरा, मुर्तिजापूर, रावेर, बर्‍हाणपूर तसेच नेपानगर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्मचे तिकीट आता 30 रुपये राहणार आहेत. हा निर्णयाची अमलबजावणी 18 मार्च ते 15 एप्रिल पर्यंत  असणार असल्याचे सांगण्यात आले आहे.  रेल्वे स्थानकावर अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.