आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करा - संपदा पाटील



चाळीसगाव (प्रतींनिधी) - करोना विषाणू संसर्ग होऊ नये यासाठी आरोग्य विभागाने जनजागृती सुरू केली आहे. शिंकताना खोकतांना तोंडाला रुमाल लावा दिवसातून वेळोवेळी आपले हाथ स्वच्छ धुवून काढा या सारख्या उपाययोजना काळजी पूर्वक अंमलात आणा सावध रहा घाबरू नका.महिलांनी विशेष काळजी घ्या असे आवाहन आज उमंग परिवाराच्या संस्थापिका संपदा पाटील यांनी केले आहे.

 


   

     टाकळी प्र चा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात आज खासदार उन्मेश दादा पाटील व उमंग समाज शिल्पी महिला परिवार आयोजीत कोरोना जनजागृती अभियान राबविण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी नेत्र तपासणी शिबीर देखील आयोजित करण्यात आले होते.

 

        यात डॉ. पाटील व डॉ. साळुंखे यांनी 105  रुग्णाचे डोळे तपासणी केली यात 24 रुग्णांवर मोफत नेत्र शस्त्रक्रिया केली जाणार आहे. याप्रसंगी योगाचार्य प्रा. मधू कासार यांनी हाथ धुण्याचे प्रात्यक्षिक सादर करीत मार्गदर्शन केले.

 

         रोटरीचे समकीत छाजेड, टाकळी प्र चा तंटा मुक्ती अध्यक्ष कपिल रामभाऊ  पाटील, आण्णा गवळी ,अक्षय मराठे ,सोनु अाहिरे ,मनोज पारधी, भोजराज खैरे ,योगेश गव्हाणे, बबड़ी शेख ,सारंग जाधव, विवेक चौधरी, दीपक नेटकर,सर्वेश पिंगळे,शिवराज पाटील,शिवाजी मराठे, संदीप काळे,प्रशांत पवार संदीप पाटील, बंटी मोरे, प्रदीप पाटील, मनोज पाटील, अमोल मोरे  प्राथमिक आरोग्य केंद्र  आरोग्य सेविका सरला मानकर अनीता महाजन, अंगणवाडी सेविका जनाबाई पाटील, शकुंतला काकलीद, सुनीता पाटील, सुनीता राजू पाटील,दीपमाला पवार, संगीता जाधव, रत्ना भदाणे, मालती बागुल,कल्पना शिंदे आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.