जळगाव ( प्रतिनिधी ) - येथील अजिंठा चौफुलीजवळील इदगाह कॉम्पलेक्समधील पुरोगामी पत्रकार संघाच्या कार्यालयात आज दि. 08 रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला पदाधिकार्यांसह संघटनेच्या पदाधिकारर्यांचा सन्मान करण्यात आला.
यामध्ये सौ.आरती पवार, संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्षा रंजना अडकमोल, दिपाली कुमावत, हर्षा सोनार यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पुरोगामी पत्रकार संघाची बैठक ही आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पदाधिकार्यांपैकी कोअर कमेटीचे अध्यक्ष विनोद पवार, जिल्हाध्यक्ष अश्विन खैरनार, शैलेंद्र सोनवणे, मनोज वाघ, महाराष्ट्र 99 न्यूजचे संपादक प्रकाश पाटील, सामाजिक कार्यकर्ते, पंकज शर्मा, सखाराम शिंदे, भूषण देशमुख, शरद भालेराव यांचाही शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अभिजित पवार, अमोल सोनार, लक्ष्मण सोनार, विशाल बिंदवाल यांच्यासह आदी उपस्थित होते.
महिला जिल्हाध्यक्षपदी रंजना अडकमोल
बैठकीत कोअर कमेटीचे अध्यक्ष विनोद पवार आणि जिल्हाध्यक्ष अश्विन खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याची महिला कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. त्यात जिल्हाध्यक्षपदी रंजना अडकमोल, उपाध्यक्षपदी सौ.आरती पवार, सचिवपदी दिपाली कुमावत तर सहसचिव म्हणून सौ.हर्षा सोनार यांचा समावेश आहे. उर्वरित पदांवरही लवकरच महिला प्रतिनिधींची नियुक्ती करणार असल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी दिपाली कुमावत हिने महिलांविषयी मनोगत व्यक्त केले. तसेच जिल्हाध्यक्ष अश्विन खैरनार यांनीही मार्गदर्शन करून संघटनेचे कार्य वाढविण्याचे आवाहन केले.
प्रास्ताविकात जिल्हा उपाध्यक्ष शरद भालेराव यांनी पुरोगामी पत्रकार संघाविषयी माहिती देताना आपली संघटना आता राष्ट्रीय स्तरावर जाऊन पोहचली असून संघटनेचे कार्य देशभरात जोमाने सुरु आहे. संघटनेची जिल्ह्याची कार्यकारिणी लवकरच बदलवून नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात येणार आहे. येत्या 15 तारखेला पुणे येथे राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार आहे. त्यासाठी नाव नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले.
बैठकीत उत्तर महाराष्ट्र मेळावा घेणे, जिल्हाधिकारी आणि एसपी यांना विविध मागण्यांसाठी निवेदन देणे, कामगार दिनानिमित्त उत्कृष्ट कामगारांचा सन्मान कार्यक्रमाचे नियोजन आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. सूत्रसंचालन शरद भालेराव यांनी तर आभार सौ.आरती पवार यांनी मानले.