जळगावात कोरोनाचा शिरकाव : एक रुग्ण पॉझिटिव्ह

जळगाव ( प्रतिंनिधी ):- कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली असून 21 दिवसांकरीता म्हणजेच 14 एप्रिलपर्यंत हा देश लॉकडाऊन आहे. आता पर्यंत शहरात एकही कोरोंना रुग्ण नसल्याने जळगावकर निर्धास्त होते. मात्र आज संध्याकाळी एका 49 वर्षीय रुग्णाचे रिपोर्ट पोंझीटिव्ह  आल्याने एकच खळबळ उडाली आहे. 



     शहरात आतापर्यंत हजारो संशयितांच्या चाचण्या करण्यात आल्या मात्र आजपर्यंत कुणाचाही रिपोर्ट  पॉझिटीव्ह आला नव्हता. मात्र आज शहरातील रुग्णाचा रिपोर्ट पोंझीटिव्ह  आला आहे. हा रुग्ण काही दिवसापूर्वी शहरातील  मेहरून भागात दुबहून  परतला असल्याची माहिती मिळाली आहे. या रुग्णावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.


       या रूग्णाला काल संध्याकाळी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कालच या रुग्णाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.